शिवसेनेला विश्वासात घेऊनच राणेंच्या प्रवेशाबाबत निर्णय

2

मुख्यमंत्री फडणवीस:यांनी खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली माहीती

मुंबई ता.३०: शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षाचं भाजपमध्ये विलीनीकरण करणार नाही,अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
नारायण राणे यांनी काल आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे,अशी गुगली टाकली होती त्यांचा पक्ष प्रवेश १ सप्टेंबरला होणार आहे.अशी चर्चा होती.तर ते आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असेही त्यांचे म्हणणे होते.दरम्यान या सर्व राजकीय वादळानंतर संबंधित पक्षप्रवेशा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता,राणे भाजप मध्ये येण्यास इच्छुक आहेत.त्यांनी आपला पक्ष विलीन करण्याची तयारी सुद्धा दर्शविली आहे परंतु त्यांना घेण्याबाबत शिवसेनेशी चर्चा केली जाणार आहे.आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहेत.असे श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.त्यामुळे नारायण राणे यांच्या भाजप प्रवेश तूर्तास तरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

10

4