आशिष सुभेदार;स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन….
सावंतवाडी ता.३०: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सावंतवाडी शहर मर्यादित “इकॉफ्रेंडली” गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये,द्वितीय तीन हजार रुपये तर तृतीय दोन हजार रुपये व उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.अशी माहिती मनविसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.
ही स्पर्धा दिनांक २ सप्टेंबर ते अनंत चतुर्दशी या काळात राबवली जाणार आहे. स्पर्धेत विनामूल्य प्रवेश असणार आहे.सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने आपली नावे मनविसेच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधून द्यायची आहेत. त्यानंतर परीक्षक प्रत्येक स्पर्धकाच्या घरी येऊन भेट देऊन परीक्षण करणार आहेत.स्पर्धेसाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव हा विषय ठेवण्यात आला आहे.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ललिता नाईक 8623027881,शुभम घावरे 7768904916, ओंकार कुडतरकर 9420795162 यांच्याकडे नोंदवावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे