सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही माझी तितकीच ताकद

2

नारायण राणेंचा दावा:निलेश व नितेश विधानसभा लढणार

मुंबई ता 30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझी आजही तितकीच ताकद आहे, त्यामुळे एक दोघे जण विरोध करत असेल तर तो फारसा टिकणार नाही.राज्यात आणि देशात ज्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे त्यांचा विरोध नाही मग जिल्ह्यातील विरोध कसा काय टिकेल अशी भूमिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडली.
दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले पुत्र निलेश व नितेश हे दोघेही विधानसभा लढणार आहेत. परंतु आपण निवडणुकीला सामोरे जाणार नाही. शिवसेनेवर आपण टीका करणार नाही. मात्र आपल्यावर कोण टीका करत असेल तर गप्प बसणार नाही. असा इशारा राणे यांनी यावेळी दिला. त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते

9

4