नारायण राणे यांच्या मुळेच केसरकरांचा उदय

2

राजन तेली:पहिली “डील” मी केल्यामुळे ते नगराध्यक्ष झाले…

सावंतवाडी ता.३१: पालकमंत्री दीपक केसरकर यांचा उदय केवळ नारायण राणे यांच्यामुळेच झाला.पहिली “डील” मी केल्यामुळे ते नगराध्यक्ष,आमदार आणि मंत्री झाले.अन्यथा आजही ते नगराध्यक्ष असते असा गौप्यस्फोट माजी आमदार तथा भाजपचे नेते राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
श्री.केसरकर हे शिवसेनेचे नेते आहेत.त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षावर बोलावे आमच्या पक्षात लुडबुड करू नये अशी टीका करीत केसरकर मंत्री झाले पण जिल्हयाला फायदा काय झाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.राणेंना घ्यावे की न घ्यावे हा पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय आहे.त्याबाबत आम्ही काय बोलणार नाही.याचा अर्थ राणेंचे आणि माझे काही बोलणे झाले असा होत नाही.मी पक्ष सोडल्यानंतर आज पर्यंत राणेंना भेटलेलो नाही.असे तेली यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आमच्याकडे राणेंच्या प्रवेशाबाबत आजपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.केसरकर कोणाच्या मिठाला जागले नाही.ते नगराध्यक्ष आणि आमदार नारायण राणे यांच्यामुळे झाले.त्यांचा उदय राणेच मुळे झाला मात्र गरज सरो आणी वैदय मरो अशी त्यांची परिस्थिती आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग,मनोज नाईक,प्रथमेश तेली आदी उपस्थित होते

18

4