खारेपाटण-वारगाव येथे प्रवाशांचे स्वागत…
कणकवली, ता.३१: आमदार नितेश राणे यांनी १००रुपयात चाकरमानी गणेश भक्तांना गावी येण्यासाठी शंभर गाड्या मुंबई येथून सोडल्या. त्यातील पहिल्या टप्प्यातील गाड्या सिधुदुर्गात दाखल झाल्या,या गाड्यांचे खारेपाटण वारगाव येथे स्वाभिमानच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून प्रवासकारणाऱ्या गणेश भक्तांना चहा व बिस्कीट चे वाटप केले.दरम्यान आम.नितेश राणे हे शंभर रुपयात ही सेवा उपलब्ध करून देत असल्यांमुळेच आम्ही संपूर्ण कुटूंब गणेशोत्सवाला गावी पोचू शकलो अशी प्रतिक्रिया सौ.सरस्वती साळगावकर या प्रवाशी महिलेने दिली.
आम.नितेश राणे यांच्या वतीने गेली सह वर्षे १०० रुयात गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी मुंबई येथून प्रवास हा अभिनव उपक्रम राबविला जातो. चतुर्थीच्या काळात मुंबई हुन रेल्वे चे तिकीट मिळत नाही.खासगी गाड्या चे तिकीट दुप्पट ,तिप्पट झालेले असते.त्याचा भुर्दंड कोकणातील आपल्या गणेश भक्तांना बसू नये यासाठी आम.नितेश राणे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.आज शनिवार 31 ऑगस्ट रोजी १०० पैकी काही गाड्या सिधुदुर्गात दाखल झाल्या, उद्या आणि परवा सुद्धा गाड्या येणार आहेत. आज आलेल्या गाड्यांचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष खारेपाटण विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भालेकर आणि निखिल वळंजू मित्रमंडळ वारगाव यांच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे स्वागत करण्यात आले.
यावेळी निखिल वळंजु, प्रतिक गुरव, आशिष कोकाटे,सिध्दांत केसरकर, अनिकेत मांडवकर, मंगेश सुतार, नडगिवे सरपंच अमित मांजरेकर व खारेपाटण रिक्षा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.प्रवाशांना यावेळी निखिल वळंजू मित्रमंडळ वारगाव यांचेकडून अल्पोपहार वाटप करण्यात आले. या स्वागताने सर्व प्रवासी भारावून गेले.निखिल वळंजू या युवा कार्यकर्त्यांच्या तत्परतेने कै.बाळा वळंजु यांची आठवण झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.