बांदयात संशयास्पद बॅग आढळल्यामुळे खळबळ….

2

बांदा
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बांदा येथील एका कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद बॅग आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.
हा प्रकार आज दुपारी घडला.शहरातील कट्टा कॉर्नर चौकात मुंबई-गोवा महामार्गनाजीक ओवेस कॉम्प्लेक्स येथे सलून मध्ये कालपासून ही बॅग संशयास्पद होती. कोणीतरी या बागेत काहीतरी बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या बॉम्बशोधक पथकाने ही बॅग उघडून पाहिली, मात्र त्या बॅगेत कपडे आढळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यामुळे या प्रकाराची चर्चा शहरात जोरदार सुरू होती. कोणीतरी पोलिसांनी ही रंगीत तालीम घेतल्याचे सांगितले.
परंतु प्रत्यक्षात ती बँक अज्ञात व्यक्तीची होती असे पोलिसांचे म्हणणे आहे

7

4