आमदार वैभव नाईक यांच्याकडून गणेश भक्तांना पूजेचे साहित्य वाटप…

2

कुडाळ, ता. ३१ : कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांना पूजेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. घराघरात हे साहित्य पोचविण्यासाठी सध्या कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
गेली काही वर्षे आमदार नाईक गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना पूजेचे साहित्य देत आहेत. यावर्षीही अगरबत्ती, तेल, कापूर ,कापूस, खडीसाखर, आरती संग्रहाबरोबर पाच वर्षातील कामकाजाचा अहवाल गणपती कॅलेंडर, पिशवी, हे साहित्य भेट स्वरूपात दिले जात आहे. आमदार नाईक यांनी दिली यांनी दिलेली प्रेमाची भेट कुडाळ तालुक्यातील प्रत्येक घरात पोचविण्यासाठी गोठोस गावातील शिवसैनिक मेहनत घेत आहेत.
कुडाळ तालुक्यातील गोठोस येथे साहित्य पोहचल्यानंतर गोठोस शिवसेना शाखाप्रमुख संतोष बांदेकर व किशोर वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते गोठोस गावात साहित्याचे वाटप करत आहेत. आमदार नाईक यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

14

4