सावंतवाडीत रोटरी क्लबच्या वतीने गणेश सजावट स्पर्धा…

2

सावंतवाडी ता .३१: रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने गणेश चतुर्थीच्या काळात शहर मर्यादित इकोफ्रेंडली गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा दीड दिवसाचे गणपती वगळून अनंत चतुर्थी पर्यंतच्या गणपतीसाठी असणार आहे.
या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना रोटरी क्लबच्या वतीने विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे काणेकर खेळणी दुकान गांधी चौक ,बाळकृष्ण कॉलनी जयप्रकाश चौक यांच्याकडे द्यावीत असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

18

4