सिंधुदुर्ग भाजपामध्ये इनकमिंग जोरात…

2

 

: भाजपामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात इनकमिंग जोरात सुरू असताना भाजपा प्रदेश सचिव व माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत काळसे बागवाडीतील शेकडो ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या व स्थानिक भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाचा झेंडा खांद्यावर घेत पक्षप्रवेश केला.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात काळसे बागवाडी येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसून मोठे आर्थिक नुकसान झाले. या बाधित कुटुंबांना सावरण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात मदत केली. यामुळे येथील जनतेच्या मनात एक वेगळीच आत्मीयता, एक ऋणानुबंध निर्माण झाले असल्याचे सर्व राहिवाशांनी एक मताने मान्य केले. भाजयुमो मालवणचे माजी तालुकाध्यक्ष राहुल कुलकर्णी हे तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवेळी नेहमीच त्यांच्यासोबत उभे असतात. त्यांच्या आपलेपणावर विश्वास दाखवत युवकांनी आपल्या भागातील ज्येष्ठ ग्रामस्थांना भाजपाच्या विकास मोहिमेच्या प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी प्रवृत्त केले.
भाजपा सरकारच्या काळात मागील ५ वर्षात सर्वसामान्यांसाठी झालेल्या योजना, सोई सुविधा पहाता या पुढील काळात जर आपण भाजपा सोबत राहिलो तर निश्चितच विकासाला वेग येईल याची खात्री झाल्यानंतरच अशा प्रकारचे जाहीर प्रवेश होतात असे राजन तेली म्हणाले. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी महिलांनी केली. या समस्येवर देखिल तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन विजय केनवडेकर यांनी दिले. राहुल कुलकर्णी यांच्या सोबत मंगेश कुलकर्णी हे सुद्धा काळसे गावातील तरुण मित्र मंडळींना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी नेहमीच काम करत असतात आणि आता आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली.
यावेळीे संदीप पावसकर, तुळशीदास परब, रूपेश पावसकर, रोशन पावसकर, धोंडी धुरी, द्वारकानाथ पावसकर, रामा पावसकर, संजय परब, सुभाष हेरेकर, विनायक माडये, भुषण कुडाळकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला. ज्येष्ठ ग्रामस्थ सुधा कोरगावकर यांनी विभागाच्या पुढील विकासासाठी शुभेच्छा दिल्या.
या जाहीर प्रवेश कार्यक्रमाला सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेश सारंग, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस अभिषेक चव्हाण, तालुका उपाध्यक्ष आशिष हडकर, सचिव सुहास सावंत, ओंकार बानकर, राजु कोरगावकर, विभाग अध्यक्ष बिरमोळे, मामा बांदीवडेकर, आबा पोखरणकर यांच्यासह शेकडो स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

12

4