प्रकट वाचन स्पर्धेत लाजरी कांदळगावकर प्रथम…

150
2
Google search engine
Google search engine

कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण,ता.२७: येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर आणि ओझर विद्यामंदिर कांदळगांव यांच्या वतीने वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी राज भाषा दिनानिमित्त आयोजित प्रकट वाचन स्पर्धेत लाजरी कांदळगावकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरूवात मराठी अभिमान गीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांंचे स्वागत करण्यात आले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरचे कर्मचारी संजयकुमार रोगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक ओझर विद्यामंदिर कांदळगांवचे मुख्याध्यापक दिपक जाधव यांनी केले.

स्पर्धेचा निकाल असा- द्वितीय – अस्मि पारकर, तृतीय – स्वरा कांबळी, उत्तेजनार्थ – अमृता बागवे, भूमिका कोचरेकर, तृप्ती परूळेकर, इश्वरी सांडव, प्रांजली कुंभार.

स्पर्धेचे परीक्षण ऋतुजा केळकर आणि संजयकुमार रोगे यांनी केले. सेवांगणच्या वतीने विजेत्यांना शैक्षणिक साहित्य पारितोषिक आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना साधना युवाचे अंक देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

सूत्रसंचालन तृप्ती परूळेकर हिने केले. प्रशालेच्या वतीने डी. डी. जाधव, प्रविण पारकर, एस. जे. सावंत उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना सेवांगणच्या वतीने खाऊ देण्यात आला.