ग्रामविकास अधिकारीपद तात्काळ भरा, अन्यथा उपोषण…

103
2
Google search engine
Google search engine

माजगाव सरपंच; १० महिने पद रिक्त, लोकांची प्रशासकीय कामे खोंळबली…

सावंतवाडी,ता.२८: माजगाव ग्रामपंचायतीत तात्काळ ग्रामविकास अधिकारी नेमण्यात यावा, अन्यथा १ मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा माजगाव ग्रामपंचायत सरपंच अर्चना सावंत व सर्व सदस्यांनी दिला आहे. गेले १० महिने या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी नसल्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे रेंगाळली आहेत. प्रशासकीय कामकाज करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन हे रिक्त पद भरण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध दिले आहे.