सिंधुदुर्गनगरी ता.३१:
गेल्या पाच वर्षात जनशताब्दी ट्रेनला सावंतवाडीमध्ये थांबा मिळाल्याने कोकण रेल्वेच्या पैशावर जाहिराती प्रसिद्ध करीत मोठ्या उत्साहात जल्लोष केला. एकाही नवीन गाडी सुरु करून त्याचा आनंदोत्सव साजरा केला असता तर त्याचा आनंद आम्हालाही झाला असता. शासनाचा पैसा वापरून आपला प्रचार सत्ताधारी करीत आहेत. त्यामुळे हा खर्च कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा. तसेच गेल्या वर्षी गणेश चतुर्थी दिवशी विमानाने गणपती आणत वर्षभरात चिपी विमानतळ नियमित सुरु होईल, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. आता गणपती दोन दिवसावर आला आहे. तरीही विमानसेवा सुरु झालेली नाही. यावरून केसरकर व त्यांची कंपनी देवालाही फसविण्यास घाबरत नाहीत, असे स्पष्ट होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे शनिवारी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजीत पत्रकार परिषदेला परिमल नाईक उपस्थित होते. यावेळी केसरकर यांना उद्देशून बोलताना कुडाळकर यांनी, जनशताब्दीला थांबा मिळाल्याचा आनंद साजरा करणाऱ्या केसरकर यांनी त्याचठिकाणी सावंतवाडी टर्मिनन्स कामाचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित केला होता. त्याचे काय झाले ?असा प्रश्न केला. तसेच तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. त्यामुळे सावंतवाडीचा विकास म्हणजे जिल्ह्याचा विकास नव्हे, हे लक्षात ठेवावे. कुडाळ व सिंधुदुर्ग रेल्वे थांब्यावर अनेक गाड्या थांबविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली असताना त्यातील एकतरी मागणी पूर्ण केली का ? असा प्रश्न करतानाच कुडाळवर अन्याय का ? याचे उत्तर देण्याचे आवाहन केले. यावेळी कुडाळकर यांनी, केसरकर यांच्यासह आ वैभव नाईक हे जिल्ह्याचा विकास आपणच केला, असा आभास निर्माण करीत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर खोटे चित्र तयार करीत आहेत. किमान कामे न केल्याचा पश्चाताप होणे अपेक्षित होते, असे सांगतानाच त्यांना लाज वाटली पाहिजे असही सांगितले.
यावेळी सिंधुदुर्गनगरी नगर परिषदेचा विषय मागच्या सरकारने मंजूर केला होता. पण शिवसेना-भाजपचा वाद झाल्याने भाजपच्या काही लोकांनी ही प्रक्रिया थांबविला आहे. 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या जिल्हा मुख्यालयातील एकही रस्ता सुस्थितित नाही. केसरकर वर्षभर 25 कोटी मंजूर केल्याचे सांगत आहेत. मात्र, 25 कोटी नको किमान 25 लाख रूपये तरी सिंधुदुर्गनगरीतील रस्ते भुजविण्यासठी दया, असा टोलाही कुडाळकर यांनी हाणला. प्रशासन केवल निधी खर्च करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी येथील ग्राम पंचायत सदस्य, स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी यांनाही विश्वासात घेतले जात नसल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या थीम पार्कमध्ये गेल्या पाच वर्षात एकदाही पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदार व अधिकारी गेलेले नाहीत. त्यामुळे या पार्कची गोशाळा बनवा, असाही उपरोधीक टोला कुडाळकर यांनी हाणला. तसेच गणेशोत्सव नंतर कॉंग्रेस याची पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला.
केसरकर व त्यांची कंपनी देवाला सुद्धा फसवण्यास कमी पडणार नाही… काका कुडाळकर :निवडणुकीच्या तोंडावर लोकांची दिशाभूल बंद करा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES