राणेंच्या प्रवेशाला कोणाचा विरोध असेल तर त्यांची समजूत काढू…

279
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

चंद्रकांत पाटील:त्यांच्या प्रवेशानंतरच मुलांच्या तिकिटाचा निर्णय

सातारा
नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मित्र पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. एखाद्याचा विरोध असेल तर त्याची समजूत काढली जाईल त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याशिवाय त्यांच्या मुलांच्या तिकिटाचा निर्णय देखील होणार नाही अशी माहिती राज्याचे बांधकाम मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा खोडा नाही .मी त्यांच्यासोबत काल बोललो आहे लवकरच त्यांच्यासह राणेचा प्रवेश निश्चित आहे असे त्यांनी सांगितले श्री पाटील सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते .तत्पूर्वी नारायण राणे यांनी काल एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण विधानसभा लढणार नाही परंतु निलेश व नितेश निवडणूक घडवतील असे विधान केले होते .त्याचबरोबर आपण लवकरच भाजपमध्ये आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करणार असे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी चर्चा करून राणे यांना पक्षात घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर श्री पाटील बोलत होते.

\