निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जावू नये…

2

राणेंच्या प्रवेशाच्या पाश्वभूमिवर काका कुडाळकर यांचे आवाहन….

सिंधुदुर्गनगरी ता.३१: नारायण राणे माझे नेते होते. आहेत व भविष्यात राहतील. मात्र, ते आता भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. तर कॉंग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या सोबत कॉंग्रेस सोडून स्वाभिमान पक्षात गेलेल्या निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये खा. राणे यांच्या समवेत प्रवेश करू नये, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रवक्ते हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी केले.
पुढे बोलताना कुडाळकर यांनी, कॉंग्रेसचे आता वाईट दिवस असले तरी अशा परिस्थितीत कॉंग्रेसने अनेकवेळा उभारी घेतली आहे. निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसला मोठे करण्यासाठी पुन्हा या पक्षात यावे. तुमचा मानसन्मान केला जाईल, असेही यावेळी कुडाळकर यांनी सांगितले.

10

4