महसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन…

2

रक्तदान करून विविध मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष….

सिंधुदुर्गनगरी ता.३१: महाराष्‍ट्र राज्‍य महसुल कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार ३१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला.आणि या लाक्षणिक संपा बरोबरच रक्तदान करत अनोखे आंदोलन केले.
दरम्यान हा एक दिवसाचा लाक्षणिक संप १०० टक्के यशस्वी झाला असल्याचा दावा या संघटनेच्यावतीने करतानाच ५ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही स्पस्ट केले आहे.
महसुल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले असुन शनिवारी राज्‍य संघटनेच्‍या आदेशानुसार एक दिवाशीय लाक्षणिक संपादिवशी सामाजिक बांधीलकी या उदात्‍त हेतुने रक्‍तदान शिबीराचे आयोजन जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्‍हयातील सुमारे २०० अधिकारी कर्मचारी यांनी उस्‍फुर्त पणे सहभाग नोंदवुन रक्‍तदान व आरोग्‍य तपासणी करुन घेतली. या शिबीरामध्‍ये पंधरा रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान केले. काही अधिकारी , कर्मचारी यांची आरोग्‍य तपासणी केली असता मधुमेह, उच्‍चरक्‍तदाब आढळुन आल्‍याने अशा अधिकारी कर्मचा-यांना रक्‍तदान करण्याची इच्‍छा असुनही ते रक्‍तदान करुषकले नाहीत.रक्तदान केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना जिल्‍हा रक्‍तपेढी मार्फत प्रमाणपत्र देवुन गौरविणेत आले. सदर शिबीरामध्‍ये उत्‍स्‍फुर्तपणे सहभाग घेतलेबद्दल जिल्‍हा महसुल कर्मचारी संघटनेच्‍या वतीने उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.त्याचप्रमाणे या एक दिवशीय लाक्षणिक संपा दिवशी जनतेच्‍या झालेल्‍या गैरसोईबद्दल संघटनेच्‍या वतीने दिलगीरी व्‍यक्‍त करण्यात आली.
अन्यथा ५ सप्टेंबर पासून बेमुदत संप
टप्‍पानिहाय आंदोलन करुनदेखील शासनाकडुन महसुल कर्मचा-यांच्‍या मागण्‍याची पुर्तता न केल्‍यास ५ सप्‍टेंबर २०१९ पासुन सर्व अधिकारी,कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. असेही संघटनेच्‍या वतीने जाहिर करण्यात आले असुन, सर्व महसुल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप १०० टक्के यशस्‍वी करावा असे आवाहनही जिल्‍हा संघटनेकडुन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य महसुल अधिकारी कर्मचारी संघटनेचे श्री.संतोष खरात, श्री.सत्‍यवान माळवे, अशोक पोळ, परमेश्‍वर फड,श्री.दिपक महाडीक,शिवराज चव्हाण, संभाजी खाडे नरेंद्र एडके, स्‍वप्निल प्रभु, श्री.मनोज काळे, संदीप हांगे श्री.गावकर, श्री.पाडावे असे पदाधिकारी हजर होते

10

4