जिल्हा बँकेकडून पूरग्रस्तांना सात लाखांच्या मदतीचा हात…

2
सिंधुदुर्गनगरी ता.३१ जिल्हा बँकेला शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आम्ही काही देणे लागतो या उद्देशाने आज अतिवृष्टीमध्ये बाधीत झालेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना बँकेच्या अधिकारी कर्मचारी यांचे एक दिवसाचे तर संचालक मंडळाचा एक महिन्याचा भत्ता अशी मिळून ७ लाखाची आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे. असे असले तरी आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडूनही नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आजच्या कार्यक्रमात बोलताना दिली.
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत आर्थिक मदत करण्याचा कार्यक्रम जिल्हा बँकेत बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँकेचे संचालक गुरुनाथ पेडणेकर, आत्माराम ओटवणेकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, दूध उत्पादक संस्था अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यात ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांकडील दूध गोकुळ दूध संस्थेने संकलन केले नव्हते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे हजारो लीटर दूध वाया जावून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने जिल्हा बँकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने आपले एक दिवसाचे माधन आणि बँकेच्या संचालक मंडळाचा एक महिन्याचा भत्ता देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार ७ लाख रूपये एवढी रक्कम जमा झाली. ही रक्कम जिल्हा बँकेची संलग्न असलेल्या ६४ दूध उत्पादक संस्थांच्या १४९२ शेतकऱ्यांना आज बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी सतीश सावंत म्हणाले की, ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टित घर, दुकान, शेती आदिंची नुकसानी झलेल्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली. मात्र या अतिवृष्टीमुळे दुधाचे नुकसान झालेल्या शेतकरी मात्र शासनाच्या मदतिपासून दुर्लक्षित राहिला आहे. सिंधुदुर्ग. जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक म्हणून ओण

7

4