Tuesday, July 8, 2025
Google search engine
HomeUncategorizedसिंधुदुर्गात ६८ हजार घरगुती,३४ सार्वजनिक गणपती विराजमान होणार...

सिंधुदुर्गात ६८ हजार घरगुती,३४ सार्वजनिक गणपती विराजमान होणार…

सिंधुदुर्गनगरी ता.३१: जिल्ह्यात ३४ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ३१३ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३४७ ठिकाणी गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. यनिमित्त जिल्ह्यात धामधुम सुरु झाली आहे.
कोकण म्हटले की, उत्सवांची आठवण येते. आणि कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे आणि परगावी असणारे चाकरमानी आपापल्या गावी येतात. एक दिवसावर आलेला हा गणेशोत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो.आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन २ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला होणार आहे. प्रामुख्याने कोकणात घराघरात गणेशउत्सव श्रद्धेने साजरा होतो. मुंबई व अन्य ठिकाणी असलेले जिल्हावासीय चाकरमानी या निमित्ताने आपापल्या गावी येतात दीड दिवसापासून ११ दिवसांपर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत हा सण साजरा होतो. काही नवसाची गणपती अनंत चतुर्थी नंतरही थांबतात. हा सण सुरळीत व शांततेत व्हावा यासाठी पोलीस आणि जिहा प्रशासन खबरदारी घेत असून या निमित्त वाढलेली वाहतूक सुरळीत राहावी या साठी प्रशासनाचा कटाक्ष असतो. रेल्वेनेही यावर्षी मोठ्या प्रमाणात गणपती साठी खास गाड्या कोकणात सोडल्या आहेत.याशिवाय मुंबई गोवा महामार्गावर खासगी व एसटी ची बस सेवा तसेच आपापल्या खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी भाविक दाखल होत आहेत त्यामुळे रेल्वे स्थानके बस स्थानक या गर्दीने फुलले आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठामध्येही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. गणपतीच्या शाळा गजबजल्या असून मूर्तिकार अखेरचा हात फिरविण्याच्या गडबडीत आहेत. काही शाळांमधून तर बाप्पाला आपल्या घरी नेण्याचे काम सुरू झाले आहे.
३४ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव
कुडाळ येथील सिंधुदुर्गाचा राजा यासह ३४ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव होत आहे. यामध्ये दोडामार्ग ५, बांदा २, सावंतवाडी ६, वेंगुर्ला ३, कुडाळ ५, मालवण २, आचरा १, देवगड १, कणकवली ५ आणि वैभववाडी ४ असे ३४ सार्वजनिक गणेशोत्सव त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत आहेत.
६८३१३ घरगुती गणेशोत्सव
घरगुती गणेशोत्सवामध्ये दोडामार्ग मध्ये ४८४९, बांदा २६१०, सावंतवाडी ९९८५, वेंगुर्ला ५४२२, निवती ३३१७, कुडाळ ६६९७, सिंधुदुर्गनगरी २३२०, मालवण ४७५२, आचरा २४८०, देवगड ६७७९, विजयदुर्ग ३३३०, कणकवली १०४०२ तर वैभववाडी ५३७० अशी ६८ हजार ३१३ कुटुंबे गणरायाचे पूजन करीत आहेत त्यामुळे जिल्ह्यात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments