बांदा
पूरपरिस्थिती नंतर बांदा शहर पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे आता गणेश चतुर्थीच्या काळात भाविकांच्या सुविधेसाठी बांदा ग्रामपंचायत प्रशासन सज्ज आहे. कोणाला काही समस्या उद्भवल्यास त्यांनी थेट ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन बांदयाचे प्रभारी सरपंच अक्रम खान यांनी केले
ते पुढे म्हणाले, बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाची प्रभारी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. मात्र सरपंच पदाची अधिकृत जबाबदारी गणेशोत्सवानंतर घेणार आहे. मंदार कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार हाकणार आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य व जाणकार यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण आहे. सर्वांना सोबत घेऊन बांदा शहराचा विकास करण्यास कार्यकारिणी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सव काळात शहरात अखंडीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सुचना महावितरण विभागाला दिलेल्या आहेत. बँकानाही ग्राहकांच्या गरजेनुसार अतिरिक्त कॅश काऊंटर सुरू करण्यास सांगितले आहे. सर्व अवजड वाहनांना महामार्गावर बंदी असल्याने सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या जागेत सोय करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.