बांदा ता.३१: आरोसबाग येथील साईश सुवर्णा तारी (वय १९) हा युवक माडावरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले.
ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. साईश हा तेरेखोल नदीपात्रालगत आपल्या नालकीच्या माड बागायतीत माडावर चढून नारळ काढत होता. पावसाची रिपरिप सुरू असल्याने माड ओले झाले होते. अशातच माडावर चढण्याचा प्रयत्न करत असताना साईश हा घसरून खाली पडला.
यामध्ये त्याच्या डोक्याला, पायाला, हाताला व बरगाड्यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहिस्ता खान यांनी प्राथमिक उपचार केलेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.
बांदा-आरोसबाग येथील युवक माडावरून पडून गंभीर…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES