मर्डे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६६ टक्के मतदान…

200
2
Google search engine
Google search engine
Google search engine

३ सप्टेंबरला मतमोजणी ; कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष…

मालवण, ता. ३१ : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. ६६ टक्के मतदान झाले. येत्या ३ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. झाले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
मसुरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन मर्डे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण ११ सदस्यांपैकी ५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ६ सदस्य पदासाठी १२ उमेदवार व सरपंच पदासाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आज सकाळपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. २४०० मतदारांपैकी १५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मर्डे प्रभागातून ५४४ पैकी ३८५, वाडी डांगमोडे प्रभागातून ४९९ पैकी ३०७, खाजनवाडी प्रभागातून ५८२ पैकी ३९९, मसुरे गडघेरा प्रभागातून ७७२ पैकी ५०१ मतदारांनी मतदान केले.
गावविकास पॅनेल व शिवसेना पुरस्कृत पॅनेल यांच्यात निवडणूक असल्याने ती प्रतिष्ठेची बनली होती. ५ बिनविरोध सदस्यांमध्ये ४ सदस्य गावविकास पॅनेलचे तर एक सदस्य शिवसेना पॅनेलचा बिनविरोध निवडून आला आहे. उरलेल्या सहा सदस्यांपैकी दोन सदस्य गावविकास पॅनेलचे निवडून आल्यास त्यांचा उपसरपंच विराजमान होऊ शकतो. गावविकास पॅनेलला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभीमान या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.
३ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत गावविकास पॅनेल की शिवसेना पुरस्कृत पॅनेल बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

\