स्वाती यादव यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती…

485
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,३१: येथील पोलिस ठाण्याच्या महिला अधिकारी स्वाती अंकुश यादव यांची पदोन्नती सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश काल रात्री त्यांना प्राप्त झाले.उद्या त्यांना मुंबई येथे हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सौ. यादव या वयाने लहान असलेल्या जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. त्या २०११ मध्ये पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. त्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना मुंबई, रत्नागिरी याठिकाणी काम करण्याची संधी देण्यात आली होती. सद्यस्थितीत या सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस निरीक्षक सुनील धनावडे व अन्य सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचे अभिनंदन केले.

\