सावंतवाडीचे सुपूत्र सुभाष पुराणिक यांची विभागीय वन अधिकारीपदी वर्णी

2

सावंतवाडी
येथील वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांची पांढरकवडा येथे विभागीय वनअधिकारी म्हणून निवड झाली आहे.
आज त्यांना याबाबतचे आदेश प्राप्त झाले.येत्या दोन दिवसात ते आपला कार्यभार स्वीकारणार आहे. मूळचे सावंतवाडी असलेले श्री पुराणीक हे दोन वर्षापूर्वी सावंतवाडी येथे सहाय्यक वनसंरक्षक म्हणून आले होते.या काळात त्यांनी चांगले काम केले होते. या काळात अत्यंत शिस्तबद्ध नियोजन त्यांनी केले होते बेकायदा वृक्षतोड,वृक्ष लागवड याकडे विशेष लक्ष दिले होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना वन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

4

4