वैभववाडी.ता,१: सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक भारती संघटना वैभववाडी यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी रु.६ हजार ३५० चा धनादेश वैभववाडीचे नायब तहसीलदार ए. के. नाईक यांच्याकडे अध्यक्ष ए. एस. कांबळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष संदीप तुळसकर, सचिव स्वप्नील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.पाटील उपस्थित होते.एस.डी. खडतरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यात आलेल्या महाप्रलयाने सर्वांनाच अस्वस्थ केले होते. पूरग्रस्तांना अनेक मार्गांनी मदतीचा ओघ सुरुच होता. शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या सूचनेनुसार मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्त निधी संकलित करण्यात आला.यामध्ये एस.ए.कुंभार,एम.एन.बोडके,एस.डी.खडतरे एस.एस. पाटील,सौ.हिरुगडे,सौ.नांदलसकर( सर्व कोकिसरे ),इयत्ता ६ अ,७ अ चे विद्यार्थी कोकिसरे हायस्कूल,डी.एस. पाटील नाधवडे,ए.एस.कांबळे हेत,डी.एस.पाटील,आर.डी.कदम,बी.पी,धनवडे,
एन.पी.डावरे,एच.एस.सावंत,एस.आर.गोसावी,बी.व्ही. पेडणेकर ( सर्व लोरे हायस्कूल ),आर.एन.माने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नेर्ले हायस्कूल यांनी योगदान दिले.
शिक्षक भारती संघटना वैभववाडीच्यावतीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES