ब्रेकिंग मालवणीच्या आरती संग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन…

2

सावंतवाडी ता.०१: ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन नगराध्यक्ष बबन साळगावकर व मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.यावेळी ब्रेकिंग मालवणीने सुरू केलेला “ई आरती संग्रह”सारखा वेगळा उपक्रम स्तुत्य आहे,असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार संतोष सावंत,अभिमन्यू लोंढे,उमेश तोरस्कर,हरिश्चंद्र पवार,राजेश मोंडकर,नागेश पाटील,भूषण आरोसकर,रणजित जाधव,कु काव्या सावंत,ब्रेकींग मालवणीचे अमोल टेंबकर,ब्युरो चिफ शुभम धुरी,जिल्हा जाहीरात प्रतिनिधी तेजल कदम,निखिल जाधव,रोहित पोकळे,भक्ती पावसकर प्रशांत मुळीक आदी उपस्थित होते.

13

4