सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने गजानन नाईक यांचा वाढदिवस साजरा…

2

सावंतवाडी.ता,१:  मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेले गजानन नाईक यांचा ६५ वाढदिवस त्यांच्या दैनिक कोकणसाद च्या कार्यालयांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय देसाई हे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना सोबत अँड. संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, उमेश तोरस्कर, हरिश्चंद्र पवार, राजेश मोंडकर, अमोल टेंबकर, प्नसन्न राणे,जतिन भिसे,नागेश पाटील, शुभम धुरी, भूषण आरोसकर, रणजित जाधव, कु काव्या सावंत तेजल कदम, निखिल जाधव, रोहित पोकळे, भक्ती पावसकर, प्रशांत मुळीक आदी उपस्थिती होते.

131

4