वेंगुर्ले-भाजपाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप…

2

वेंगुर्ले.ता,०१: तालुका भाजपाच्या वतीने मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटपाचा कार्यक्रम प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण यांच्या सौजन्याने ५४ जेष्ठ पुरुष व महिलांना छत्र्या देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई,श्री. देवी सातेरी विविध कार्य सोसायटी,वेतोरेचे चेअरमन विजय नाईक,ग्रामपंचायत सदस्या कविता नाईक,रविंद्र खानोलकर,केशव ठाकुर,बाळकृष्ण मयेकर,संतोष तेंडोलकर,ओंकार मराठे तसेच मठ गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.

2

4