वेंगुर्ले-मठ येथील ५० महिला-पुरुषांचा भाजपात प्रवेश…

2

वेंगुर्ले, ता.०१: मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आज मठ गावातील ५० महिला व पुरुषांनी प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई,श्री.देवी सातेरी विविध कार्य सोसायटी वेतोरेचे चेअरमन विजय नाईक,जेष्ठ कार्यकर्ते केशव ठाकुर,ग्रामपंचायत सदस्या,कविता नाईक,रविंद्र खानोलकर उपस्थित होते.
यावेळी नुतन नरेंद्र नाईक,प्रमिला पांडुरंग मोबारकर,सपना श्रीरंग नाईक,विनया विनोद शेणई ,वैशाली वासुदेव ठाकुर,विद्या नाईक ,ययाती नाईक,सुषमा नाईक,स्नेहल गावडे ,रसीका कोचरेकर,दिव्या मोबारकर इत्यादींनी प्रवेश केला.
तसेच संतोष तेंडोलकर,बाळकृष्ण मयेकर,मनोहर नाईक,श्रीरंग नाईक,पांडुरंग मठकर,भास्कर ठाकुर,गजानन गावडे,मनोहर आईर,पांडुरंग ठाकुर,रविंद्र मठकर,सुभाष मठकररामा मठकर , सगुण मठकर , लवु मठकर , सीताबाई मठकर , आनंदी मठकर , मेघःशाम सरमळकर इत्यादी ग्रामस्थांनीही भाजपा मध्ये प्रवेश केला.

20

4