विधानसभेच्या तीन जागांसाठी भाजपकडून ९ जणांची दावेदारी

308
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अतुल काळसेकर, संदेश पारकर, बाबा मोंडकर, राजन तेली, स्नेहा कुबल आदी इच्छुकांमध्ये

कणकवली, ता.०१: आगामी विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील तीन विधानसभा मतदारसंघातून 9 जणांनी निवडणूक लढविण्यासाठी आपली दावेदारी सांगितली आहे. यामध्ये संदेश पारकर, अतुल रावराणे, प्रमोद रावराणे, अतुल काळसेकर, बाबा मोंडकर, राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर, स्नेहा कुबल, स्मिता आठलेकर यांचा समावेश आहे.
नुकतीच कुडाळ येथे भाजपच्या कोअर कमिटी बैठक झाली होती. यात पक्षाचे निरीक्षक आणि इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या सर्व उमेदवारांची नावे प्रदेश कार्यकारीणीकडे पाठविण्यात आली आहेत. स्वबळावर किंवा युती करून निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यानंतर या इच्छुकांमधून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उमेदवार निश्‍चित करतील अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज दिली.
कणकवली मतदारसंघातून संदेश पारकर, अतुल रावराणे आणि प्रमोद रावराणे इच्छुक आहेत. कुडाळ मतदारसंघातून अतुल काळसेकर आणि बाबा मोंडकर यांनी आपली दावेदारी केली आहे. तर सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर, स्नेहा कुबल आणि स्मिता आठलेकर यांनी आपण विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.

\