Tuesday, December 2, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीतील बचत गटांना आज कोंबडी व शेळी गटाचे वाटप...

सावंतवाडीतील बचत गटांना आज कोंबडी व शेळी गटाचे वाटप…

दीपक केसरकर यांचा पुढाकार; चांदा ते बांदा योजनेमधून दिला लाभ…

सावंतवाडी,ता.१०: जिल्ह्यामध्ये बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून शहरातील बचत गटांना आज कोंबडी आणि शेळी गटाचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात २८०० महिलांना कोंबडीची पिल्ले वाटप करण्यात येणार आहेत. त्याशिवाय शेळी गटही वाटप करण्यात येणार आहे. कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे, जेणेकरून पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्हा ‘हॅप्पी एग’ म्हणून ओळखला जाईल यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य चांदा ते बांदा योजनेअंतर्गत देण्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने पोकळे यांनी दिली.

बाजारपेठेमध्ये बकऱ्यांच्या मटणाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेळीपालनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येईल. रत्नसिंधू योजनेअंतर्गत या ठिकाणी असलेल्या आंबा-काजू बागायतीमध्ये दहा खोल्या काढून तिथे रेस्टॉरंट सुरू केल्यास शासनामार्फत दहा लाखापर्यंत अनुदान मिळेल. त्यासाठीही युवकांनी पुढे यावे असे आवाहन श्री. पोकळे यांनी केले.

यावेळी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, सुरज परब, देव्या सूर्याजी, माजी नगरसेविका भारती मोरे, शर्वरी धारगळकर, पुनम जामसंडेकर, कविता पांगम, दुलारी रांगणेकर, अर्चित पोकळे, विशाल सावंत, वर्धन पोकळे, साईश वाडकर, शशांक पाटणकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments