वाहतूक काही काळ विस्कळीत; पोलिसांनी दरडी हटवून वाहतूक केली सुरळीत
वैभववाडी/पंकज मोरे.ता,१: भुईबावडा घाटातील दरडी कोसळण्याचे विघ्न टळता टळेना. रविवारी सकाळपासून संततधार कोसळणा-या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती वैभववाडी पोलीस ठाण्यात मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यात पडलेल्या दरडी बाजूला केल्या. त्यानंतर भुईबावडा घाट मार्गे एकेरी वाहतूक सुरू झाली.
रविवारी सकाळी संततधार कोसळणा-या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली. घाटात दरड कोसळल्याने वाहन चालकामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पोलीस कॉन्स्टेबल श्री सोनटक्के व सहकाऱ्यांनी घाटातील दरडी बाजूला केल्या. करूळ व भुईबावडा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना घाट मार्गात कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग घेत आहे.