Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहवश्या-गवश्यांना बाजूला ठेवून केसरकरांच्या पाठीशी रहा...

हवश्या-गवश्यांना बाजूला ठेवून केसरकरांच्या पाठीशी रहा…

विनायक राऊत:पाचशे नोक-या देणारा चष्म्याचा कारखाना पंधरवड्यात सुरू…

बांदा ता.०१  चष्म्याचा कारखाना येत्या पंधरवड्यात सावंतवाडी तालुक्यात सुरू करण्यात येणार आहे.त्या माध्यमातून पाचशेहून अधिक युवक-युवतींना रोजगार मिळेल,असा दावा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला.
विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात पाठवा त्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर फिरणाऱ्या आता हौशे-नवशे गवश्यापासून लांब रहा असेही राऊत म्हणाले.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी म्हणाले,अनंतचतुर्दशी नंतर काही दिवसात विधानसभा निवडणुका साठी आचारसंहिता लागणार आहे.त्यामुळे आत्ता अनेक अजून हवशे,नवशे आणी गवशे तुमच्याकडे मते मागण्यासाठी येतील परंतु आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या पाठीशी नेमके कोण राहिले आहेत याचा अभ्यास करून केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात पाठवा,असे आवाहन त्यांनी केले
ते पुढे म्हणाले. पूरपरिस्थिती पिडीत झालेल्या लोकांना पुन्हा सावरण्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून प्रयत्न करत आहोत.अन्य पक्षांनी मदत केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना सावरण्याची संधी परमेश्वराने देवो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते,रूपेश राऊळ,राजाराम म्हात्रे,अशोक दळवी,साई काणेकर,नागेद्र परब,विनायक दळवी,दीलीप लाखी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments