सिमेवरील प्रवेशद्वार जिल्ह्याच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरेल…

2

दिपक केसरकर:स्पोर्टस्,हाॅटेलची सुविधा दिल्याने पंचक्रोशीचा विकास…

बांदा ता.०१: येथील बांदा- पत्रादेवी तपासणी नाक्यावर उभारण्यात येणारे प्रवेशद्वार सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरेल,परिसरात अनेक प्रकल्प उभारले जाणार असल्यामुळे स्थानिक लोकांना सुध्दा फायद्याचे ठरेल,असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.दरम्यान पूरपरिस्थिती तसेच दरडी कोसळल्यामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना हक्काची घरे शासनाच्या खर्चाने बांधून देण्यात येतील लवकर,योग्य तो निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बांदा- पत्रादेवी सीमेवर उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वार तसेच तपासणी नाक्याचे उद्घाटन आज केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पूरपरिस्थिती नुकसान झालेल्या तब्बल साडेतीनशेहून अधिक कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये वाटप करण्यात आले.यावेळी येथील नियोजित टोलनाक्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केसरकर बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, उद्योगपती दिलीप लाखी,स्नेहा लाखी, जिल्हाप्रमुख संजय पडते,तहसीलदार राजाराम म्‍हात्रे, बांदा सरपंच अक्रम खान,नागेंद्र परब, विनायक दळवी,जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, अशोक दळवी,साई काणेकर, रुपेश राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रवेश द्वारा मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना याठिकाणी पर्यटनाचा माहिती घेता येणार आहे.विशेष म्हणजे तपासणी नाक्यावर एकाच ठिकाणी गाडी तपासण्यात येणार आहे.परिसरात हॉटेल गेम स्पोर्ट्स आधीची सुविधा करण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात त्या ठिकाणचा विकास होणार आहे.
केसरकर पुढे म्हणाले येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.त्या ठिकाणी दाखल झालेल्या शास्त्रज्ञांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.ज्या लोकांची घरे मातीची आहेत,नुकसान झाले आहे किंवा डोंगर खचल्यामुळे नुकसान झाले आहे.त्यांचे पुनर्वसन निश्चितच केले जाईल शेतकऱ्यांना नुकसानी आतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी चांदा ते बांदा योजनेमधून २५ लाखांची मदत देण्यात आली आहे.

9

4