Monday, November 11, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या'बाप्पा गणराया' भुईबावडा घाटातील विघ्न दूर कर.!

‘बाप्पा गणराया’ भुईबावडा घाटातील विघ्न दूर कर.!

गणेश भक्तांनी बाळगली उराशी मनोकामना

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१: ‘बाप्पा गणराया’ भुईबावडा घाटात कोसळणा-या दरडींचे विघ्न दूर कर! घाटातील दरडींचे विघ्न थांबता थांबेना. घाट मार्गातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणारे ठरत आहे. गणेश भक्ताःना घाट मार्गातून प्रवास करताना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. या घाटाला दिवसेंदिवस लागलेले ग्रहण ‘बाप्पा गणराया’ दूर कर! अशी मनोकामना उराशी बाळगून गणेश भक्तांसह वाहनचालक व प्रवासी घाट मार्गातून प्रवास करीत आहेत.
भुईबावडा व करुळ हे दोन्ही घाट मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक वाटू लागले आहेत. जून पासून आतापर्यंत तब्बल आठ ते दहा वेळा भुईबावडा घाटात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या तीन दिवसापासून संततधार पाऊस कोसळत आहे. तसेच घाटमार्गात दाट धुके असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याचीही दाट संभवना आहे.
अखंड कोकणवासियांचा सण म्हणजे गणेशोत्सव. हा सण अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. मुंबईकर काही मिळेल त्या वाहनांने गावाला दाखल होत आहेत. पुणे कोल्हापूर मार्गाला गणेभक्त पसंती देत आहेत. मात्र गेली तीन दिवस संततधार कोसळणा-या पावसाने भुईबावडा व करुळ घाटात दरडी कोसळण्याच्या मालिका सुरू झाल्या आहे. त्यामुळे गणेश भक्तांसह वाहन चालकांना घाट मार्गातून प्रवास करताना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments