मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

2

बांदा ता.०१: गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी येणार्‍या चाकरमन्याचे कुडाळमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले.दिलीप धोंडू नाईक – आरोसकर (वय ५०, रा. शेर्ले-शेटकरवाडी) असे त्यांचे नाव आहे.या घटनेने ऐन गणेशोत्सवात शेर्ले गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेर्ले-शेटकरवाडी येथील दिलीप नाईक हे नोकरीनिमित्त मुंबईत असतात. आज सकाळी ते रेल्वेने कुडाळ रेल्वेस्टेशनवर उतरले. त्यांची बहीण पिंगुळीत असल्याने ते प्रथम बहिणीकडे गेले. त्याठिकाणी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी कुडाळ येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या घटनेने शेर्ले गावावर शोककळा पसरली आहे.

12

4