सावंतवाडी तालुक्यात १४८ मि.मी.पाऊस…

2

सिंधुदुर्गनगरी ता.०१ : सावंतवाडी तालुक्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक १४८ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ७४.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जून २०१९ ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५३०.७८ मि.मी पाऊस झाला आहे.तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत.सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
दोडामार्ग 105 (4083), सावंतवाडी 148 (3918), वेंगुर्ला 84 (3664.26), कुडाळ 52 (3451), मालवण 55 (2894), कणकवली 54 (3762), देवगड 46 (2491), वैभववाडी 54 (3983) पाऊस झाला आहे.
यंदाच्या मोसमात सर्वाधिक पाऊस दोडामार्ग तालुक्यात 4083 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस देवगड तालुक्यात 2491 मि.मी. झाला आहे. दिनांक 2 व 3 सप्टेंबर 2019 रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

2

4