2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण, ता. १ : दांडी झालझुलवाडी येथील संतोष गांगनाईक यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले. आज दुपारी २.३० वाजता ही घटना घडली. घरात यावेळी संतोष गांगनाईक, त्यांची आई व एक मित्र होता. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंब्याचे झाड तोडून हटवण्याचे मदतकार्य केले. नारायण लोणे, जगदीश खराडे, रोहन सरमळकर, गौरव सरमळकर, सतीश भगत, जीवन भगत, प्रथमेश गावकर, भावेश लोणे, रितेश लोणे, हर्ष बांदकर, बाळा खराडे, नीलेश पराडकर, अमन केळुसकर, अक्षय रेवंडकर, सन्मेश परब आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. नगरसेवक पंकज सादये यावेळी उपस्थित होते. नगरपालिका कर्मचाऱ्यांनाही मदतकार्यासाठी बोलाविण्यात आले होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4