परमीट रूममधून मोबाईल चोरीस…

2

 

भरड येथील घटना ; संशयित चोरटा सीसीटीव्हीत कैद…

: शहरातील भरड येथील एका परमीट बारमध्ये आलेल्या दोघांपैकी एकाने तेथील कामगाराचा मोबाईल चोरल्याची घटना साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संशयित चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
शहरातील भरड भागात असलेल्या एका परमीट रूममध्ये मद्य पिण्यास दोन ग्राहक आठ वाजण्याच्या दरम्यान आले होते. यातील एकाने बारमधील कामगाराने चार्जिंगसाठी लावलेला महागडा मोबाईल हातोहात लांबविला. त्यानंतर मोबाईल घेत आपल्या साथीदारासह तेथून पळ काढला. मोबाईल चोरीस गेल्याचे कामगाराच्या लक्षात येताच कामगाराने मालकाला याची।माहिती दिली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात चोरीचा प्रकार कैद झाल्याचे दिसून आले. संशयित चोरट्याने निळ्या रंगाचे शर्ट घातले होते तर त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराच्या शर्टवर अब अपना टाईम आयेगा असा उल्लेख आहे. संशयित चोरट्याचा शोध सुरू असून छायाचित्रातील व्यक्ती कोणास दिसल्यास त्यांनी मोबा ९१४६१९७४७४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

3

4