कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेच्यावतीने उद्या अरुणा प्रकल्पग्रस्तांना मोफत कपडे वाटप

271
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी:कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटना, मुंबई यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पात घरे बुडून बेघर झालेल्या आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या प्रकल्पग्रस्तांना मोफत कपडे, साडी वाटपाचा कार्यक्रम बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी नेते प्रकाश मोरे यांच्या शुभहस्ते होणा-या कपडे व साडी वाटपाच्या कार्यक्रमाला माजी आमदार शेतकरी नेते पुष्पसेन सावंत, समाजभुषण जेष्ठ विचारवंत प्रकाश कमळाकर जाधव, आरपीआय नेते घनश्याम चिरणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पुनर्वसनातील ज्येष्ठ नागरिक सखाराम बाबु सावंत हे भुषवणार असून तहसिलदार रामदास झळके, कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे सचिव सदानंद मोहीते, कोषाध्यक्ष बबनभाई राजापकर,शामसुंदर जाधव, रवींद्र सोनवणे, जितेंद्र साळवी, रूपेश कांबळे, बाळकृष्ण चिंचवलकर, राजु कांबळे, प्रमोद पवार, महेंद्र जाधव, सचिन कांबळे,
मनोज कांबळे आदी कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच समता प्रतिष्ठानचे प्रदेश सरचिटणीस अभय पवार, अन्यायाचा प्रतिकार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अंकुश हिवाळे, कमलाकर धोत्रे, सचित म्हात्रे, माजी सभापती दिपक पांचाळ
समाज सेवक वसंत खानविलकर, श्रीराम आबा बांद्रे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, सरपंच आर्या कांबळे, माजी सरपंच शांतीनाथ गुरव, समाज सेवक लवू पाटेकर, प्रभाकर सावंत, अशोक बांद्रे, भाई कदम,
यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर विशेष अतिथी म्हणून
उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून धरणाच्या पाण्यात घरे बुडून झालेले नुकसान त्यामुळे प्रकल्प ग्रस्तांची झालेली वाताहात, न झालेले पुनर्वसन, न मिळालेले घरभाडे, पुनर्वसनातील तिव्र पाणी टंचाई, पालक मंत्री दिपक केसरकर यांनी आढावा बैठकीत दिलेले आश्वासन प्रकल्प ग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न आणि पुढील लढ्याची दिशा आदी विषयावर या वेळी महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती माजी सरपंच सुरेश नागप, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप भाई कदम यांनी दिली.

\