उरण येथील गॅस प्रकल्पाला आग चार जणांचा मृत्यू

171
2
Google search engine
Google search engine

रायगड उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग युनिट ला आग लागल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 आयएफएस च्या जवानांचा समावेश आहे.
ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी सी आय एफ एस कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.नेमकी आग कशामुळे लागली हे कारण कळू शकले नाही. त्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहेत.