वेळापत्रक कोलमडले:आजही तब्बल 16 गाड्या उशिरा…
कणकवली.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वेळापत्रक आज सुलभ दुसऱ्या दिवशीसुद्धा कोलमडले राहिले तब्बल १६ गाड्या उशिरा धावत असल्यामुळे सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना हाल सहन करावे लागले. यात अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे गणपतीला घरी येणाऱ्या चाकण म्हणाला अनेक दिव्यातून सामोरे जावे लागणार आहे.
उशिरा धावणा-या गाड्या पुढील प्रमाणे सीएसटी गणपती स्पेशल एक तास तीस मिनिटे उशिरा,थिविम एक्सप्रेस एक तास चाळीस मिनिटे,
,मडगाव गणपती स्पेशल दोन तास पंचावन्न मिनिट,सीएसटी मडगाव गणपती स्पेशल एक तास तीस मिनिटे,मडगाव सीएसटी गणपती स्पेशल ५ तास चाळीस मिनिटे,
कोचुवेली गरिबरथ तीन तास ४० मिनिटे,मत्स्यगंधा एक्सप्रेस एक तास तीस मिनिटे,लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्स्प्रेस बारा तास तीस मिनिट,तेजस एक्सप्रेस एक तास दहा मिनिटे,सावंतवाडी दिवा पॅसेंजर एक तास वीस मिनिट,मांडवी एक्सप्रेस ४० मिनिटे,मंगला एक्सप्रेस पन्नास मिनिट,रत्नागिरी दादर पॅसेंजर ३० मिनिटं,दिवा-सावंतवाडी पॅसेंजर पन्नास मिनिट,कोकणकन्या एक्सप्रेस पन्नास मिनिट अशा प्रकारे गाड्या धावणार आहेत.