बांदा बसस्थानकाचे नुतनीकरण होणार…

159
2
Google search engine
Google search engine
Google search engine

११ लाखांचा निधी मंजूर:सहा महीन्यात काम पुर्ण करण्याच्या सुचना…

बांदा.ता,३: येथील बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यासाठी आवश्यक असलेला ठेकेदार नेमण्यात आला आहे.या कामासाठी अकरा लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी वेळोवेळी या कामासाठी पाठपुरावा केला होता.
विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या या गावाचा विकास करण्यासाठी बस स्थानकाचे नूतनीकरण सुशोभीकरण करण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले.या मागणीची दखल घेऊन हे काम तात्काळ सुरू करण्यात यावे,अशा सूचना संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदारास दिल्या आहेत.याची माहिती श्री.कल्याणकर यांना देण्यात आली आहे.

\