निवजेतील सरपंचासह सहा सदस्यांचा भाजपात प्रवेश…

2

माणगाव ता.०३: निवजे गावातील विद्यमान सरपंच वैष्णवी पालव यांच्या सह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहावर हा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.भाजपच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे यावेळी उपस्थित सदस्यांकडून सांगण्यात झाले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, युवक अध्यक्ष योगेश बेळणेकर, तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर आदी उपस्थित होते.
या प्रवेशात उपसरपंच वामन धुरी,सदस्य सुवर्णा चव्हाण,रोबोट डेसा,निकीता गवळी,रश्मी बिडये आदींचा समावेश आहे.

6

4