कागदपडताळणी सदोषचा आरोप चुकीचा…

2

शिक्षणाधिकारी आंबोकर; प्राथमिक शिक्षक भरती प्रकरण

सिंधुदुर्गनगरी ता.०३
प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपडताळणी सदोष असल्याचा होत असलेला आरोप चुकीचा आहे. आपण स्वता पात्र उमेदवारांचे कागदपत्र तपासले आहेत. यात कागदपत्र नसल्याने 9 उमेदवार बाद केले आहेत. तसेच कागदपत्र पडताळणी सदोष असल्याची लेखी तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे अशी तक्रार असल्याचे कोणीही आपल्याला अथवा आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून सांगितलेले नाही, अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
प्राथमिक शिक्षक भरतीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांकडून पात्र ठरलेल्या उमेदवारांची होत असलेली कागदपत्र पडताळणी सदोष असल्याचा आरोप होत असल्याबाबत आंबोकर यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. मात्र, अपात्र ठरलेल्या उमेदवारांची एक मागणी योग्य असल्याचे यावेळी म्हणाले. गेली दहा वर्षे प्राथमिक शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी वयाच्या मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यांनी वयाच्या निकषात शितिलता आणावी ही केलेली मागणी योग्य असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्याला केवळ 82 शिक्षक मिळणार
राज्यात एकाचवेळी झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता 287 जागांची जाहिरात काढण्यात आली होती. यात सहावी व सातवीसाठी विज्ञान व गणित विषय शिक्षकांचा समावेश होता. प्रत्येक्ष भरती प्रक्रिया पूर्ण होवून देण्यात आलेल्या निवड यादीत जिल्ह्याला 102 शिक्षक मिळाले. त्यांची कागद पडताळणी सुरु झाल्यावर 11 पात्र उमेदवार आलेच नाही. तर सीईटी 2 परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे 9 उमेदवार बाद झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला 82 शिक्षक या भरतीतून मिळणार आहेत, असे आंबोकर यांनी सांगितले. या 82 पात्र उमेदवारांमध्ये 65 उमेदवार दहावी, बारावी परीक्षेत 85 ते 90 टक्के गुण मिळविलेले असल्याचे यावेळी आंबोकर यांनी स्पष्ट केले.

2

4