Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापोलिस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा पोलीस अधिक्षकांकडून सन्मान

पोलिस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा पोलीस अधिक्षकांकडून सन्मान

वैभववाडी ता.०३: करूळ घाटात कोसळणाऱ्या कंटेनर चालकाला आपल्या जीवावर उदार होऊन जीवदान देणाऱ्या वैभववाडी येथील पोलीस कर्मचारी संदीप राठोड यांचा पोलीस दलाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

चार दिवसापूर्वी करूळ घाटात अपघात घडला होता यात कंटेनर चालणारा चालक उदयवीर सिंह रा.उत्तर प्रदेश हे आपल्या ताब्यातील कंटेनर करुळ घाटातून वैभववाडीकडे येत होते.करुळ घाटात एका अवघड वळणावर अचानक कंटेनरचा ब्रेक फेल झाला.कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटून तो संरक्षण कठडा तोडून खोल दरीत जाता जाता थोडक्यात बचावला.कठड्याच्या दगडात कंटेनरची मागील बाजू अडकल्यामुळे कंटेनरचा ड्रायव्हर केबीनचा भाग खोल दरीच्या बाजूला हेलकावे घेत होता.चालक केबीन मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु खाली खोल दरी असल्यामुळे काही करु शकत नव्हते.एका चालकाने याची माहिती करुळ चेक नाक्यावर दिली.तिथे कार्यरत असलेले राठोड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी केबीनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला धीर दिला.इतर वाहन चालकांच्या मदतीने दोरीची शिडी तयार करुन शर्तीचे प्रयत्न करीत त्या चालकाला सुखरुप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले होते. त्यांच्या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक गेडाम यांनी त्यांचे खास अभिनंदन पञ देऊन स्वतः अभिनंदन केले आहे.यापुढेही आपण अशीच उत्तम कामागिरी बजावून जनमानसातील पोलिस खात्याची प्रतिमा उंचवाल अशी अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments