शिरोडा येथील तरुणाची दापोलीत आत्महत्या…

542
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कारण अस्पष्ट; वीज वितरण कंपनीत होता कार्यरत…

वेंगुर्ले ता.०३: दापोली येथे विज वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या वेंगुर्ला-शिरोडा येथील तरुणाने आत्महत्या केली आहे.हा प्रकार काल रात्री घडला विजय वासुदेव परब (४२) रा.परबवाडा असे त्याचे नाव आहे.त्याचे पार्थिव आज रात्री उशिरा त्याच्या शिरोडा येथील गावी आणण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली.विजय हा वीज वितरण कंपनीत वायरमन म्हणून कामाला आहे.कामानिमित्त तो आपल्या कुटुंबासह दापोली येथे राहत होता.आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह राहत असलेल्या रूममध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.त्याने रात्री आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबतची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

\