दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनात पावसाचे “विघ्न”…

2

सावंतवाडी/शुभम धुरी ता.०३: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेले चार ते पाच दिवस थैमान घालणाऱ्या पावसाने आज दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देताना सुद्धा आपली हजेरी लावली.त्यामुळे अनेकांना गणेश मुर्तीचे विसर्जन करताना अडचणी आल्या.काहींनी पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाचा राहण्याचा कालावधी वाढवला.उशिरापर्यंत पाऊस तसाच सुरू होता.त्यामुळे अनेक गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली.
पंधरवड्यापूर्वी पावसाने मोठया प्रमाणात जिल्ह्यात नासधूस केली.अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली.चतुर्थीच्या आधी चार ते पाच दिवस पाऊस नसल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.मात्र चतुर्थीच्या आदले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे चतुर्थी सणात पाऊस जाईल की नाही यात शंका होती.मात्र नेहमीप्रमाणे पावसाने आज सुद्धा आपली हजेरी कायम ठेवली.
आज सकाळपासून पावसाने सावंतवाडी,कुडाळ,दोडामार्ग भागात आपली हजेरी लावली.त्यामुळे दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देताना अनेक गणेश भक्तांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले.काहींनी तर पावसाचे प्रमाण पाहून आपल्या घरगुती गणेशांच्या कालावधीत वाढ केली.

30

4