वेंगुर्लेतील क्रिकेटपटू सुधीर सारंग यांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार…

215
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.०३: वेंगुर्ला-कॅम्प क्रीडांगणावर आपल्या कॉलेज जीवनापासून सातत्याने रमणारा, क्रिकेटच मनस्वी वेड जपणारा, गेल्या २० वर्षापासून ,सहा-सात वर्षांच्या लहान मुलांपासून ते महाविद्यालयातील युवकांवर मेहनत घेत त्यांना क्रिकेटच तंत्रशुद्ध बाळकडू देणारा क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक सुधीर सारंग याचा रोटरॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊनच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
वेंगुर्लेत राष्ट्रीय क्रीडादिनाचे अवचित्त्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे हा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरीचे प्रसिडेंट राजेश घाटवळ, बॅ, बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, वेंगुर्ला इनरव्हील अध्यक्षा वृंदा गवंडळकर, रोटरी पदाधिकारी डॉ. आनंद बांदेकर, डॉ. वसंत पाटोळे, डॉ. सदाशिव भेंडवडे, नितीन कुलकर्णी, सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, प्रकाश शिंदे, इंटरॅक्ट क्लब ट्रेझरर इशान दाभोलकर, प्रशिक्षणार्थी खेळाडू उपस्थित होते.

\