Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामर्डे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला...

मर्डे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला…

मर्डे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला…

आम. वैभव नाईकांनी विरोधकांना केले चारीमुंड्या चीत ; छोटू ठाकूर ठरले ‘किंगमेकर’…

: राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या मर्डे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास आघाडीने विरोधकांचा धुव्वा उडविताना ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकाविला.
तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या मसुरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या मर्डे ग्रामपंचायतीसाठी ३१ ऑगस्टला मतदानाची प्रक्रिया पार पडली. विभाजनातील देऊळवाडा व बिळवस या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मर्डे ग्रामपंचायतीची मतमोजणी आज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुहास खडपकर यांच्या उपस्थितीत झाली. मर्डे ग्रामपंचायत ११ सदस्यांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात सर्वपक्षीय गावविकास आघाडी ४ व शिवसेना पुरस्कृत १ जागा बिनविरोध होती. सरपंच व ६ सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवला.
सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत संदीप हडकर यांनी ८७४ मते मिळवित विजय मिळविला. गावविकासच्या संजय सावंत यांना ६२० मते, अपक्ष नारायण परब यांना ७९ मते मिळाली. १९ नोटा मतदान झाले.
सदस्य निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेना पुरस्कृत राजेश ऊर्फ पिंट्या गावकर ३४० मते मिळवून तर शिवसेना पुरस्कृत राघवेंद्र मुळीक २५६ मते मिळवून विजयी झाले. आत्माराम गावकर यांना १०२ तर विकास बागवे यांना १२३ मते मिळाली. प्रभाग क्रमांक दोनमधून गावविकास पॅनेलच्या भक्ती भोगले २७१ मते मिळवून विजयी झाली त्यांनी मानसी चव्हाण २२१ मते यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक तीनमधून शिवसेना पुरस्कृत सचिन पाटकर यांनी १९३ मते मिळवून शिवसेना पुरस्कृत स्नेहा परब यांनी २१८ मते मिळवून विजय मिळविला. अक्षय परब यांना १८२ मते तर पल्लवी नाचणकर यांना १५८ मते मिळाली. प्रभाग क्रमांक चारमधून पूजा ठाकूर २२७ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी हीना सय्यद ७३ मते यांचा पराभव केला. शिवसेना पुरस्कृत रिया शैलेश आंगणे तर गावविकास आघाडीचे रमाकांत सावंत, सारिका मुणगेकर, जगदीश चव्हाण, पल्लवी नाचणकर बिनविरोध विजयी झाले होते.
मर्डे ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या विजयानंतर आमदार वैभव नाईक येथे दाखल झाले. शिवसेना तालुका शाखा येथे सर्व विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, छोटू ठाकूर, गोपी पालव, मसुरे विभागप्रमुख पराग खोत, बंड्या खोत, तपस्वी मयेकर, दीपक देसाई, स्वप्नील आचरेकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीच्यापूर्वी स्वाभिमान पक्षातून शिवसेनेत दाखल झालेले छोटू ठाकूर या निवडणुकीत किंगमेकर ठरले. शिवसेना व आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी असल्याचे या निवडणूकीच्या निकालातून दिसले. हा विजय गावातील सर्व जनतेचा आहे. यापुढे जनतेला अपेक्षित विकास साध्य करताना संपूर्ण परिसरात शिवसेना अधिक भक्कम करण्याचे प्रमुख ध्येय असेल असे छोटू ठाकूर व विभागप्रमुख पराग खोत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे संदीप हडकर यांनी यापूर्वी मसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सेवा बजावली होती. आता नव्या मर्डे ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान हडकर यांना मिळाला. यापुढे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साध्य केला जाईल असे हडकर यांनी सांगितले. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फोनवरून संदीप हडकर यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments