सिंधुदुर्ग राजाच्या गाण्यात सावंतवाडीच्या ओंकार कलामंचाची धुम…

2

कुडाळ ता.०४: गणेशोत्सवात युट्युब वर धुमाकूळ घालणाऱ्या सिंधुदुर्गच्या राजाची महती सांगणाऱ्या “इलो रे” या गाण्यात सावंतवाडीच्या ओंकार कलामंचाच्या कलाकारांची धूम दिसत आहे.यात कागर या सिनेमातील सिनेअभिनेते शुभंकर तावडे आणि गोव्याच्या किनाऱ्यावर या गीतांमधील अभिनेते सुह्रद वर्डेकर यांनी या गाण्यावर नृत्य केले असून मंचाच्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे व कुटुंबीयांच्या संकल्पनेतून लालबागच्या राजाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा स्थापन करण्यात आला होता.या संकल्पाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने इलो रे..इलो रे.. गणपती बाप्पा इलो रे..हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.हे गाणे राजेश बामुंगडे यांनी लिहिले असून या गाण्याला प्रितेश कामत यांनी संगीतबद्ध केले आहे.
यात ओंकार कलामंचाच्या अनिकेत आसोलकर, राहुल परब, साईनाथ हनपाडे,परेश सावंत, गुरु तुळसकर ,विशाल तुळसकर, अभिषेक लाखे,आर्या जाधव,सहिता गावडे आदी कलाकारांचा समावेश आहे.या गाण्याचे चित्रीकरण – साईनाथ मठकर आणि संकेत वालावलकर यांनी केले तर लाईन प्रोडूसर म्हणून संकेत पाटकर यांनी काम पाहिले.

21

4