सावंतवाडीत पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा “मुसळधार”…

2

 चतुर्थीच्या तोंडावरच पाऊस आल्याने भक्तांमध्ये निराशा…

सावंतवाडी ता.०४: गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर आज शहरासह नजीकच्या परिसरात पुन्हा एकदा आपली दमदार हजेरी लावली.गणेश चतुर्थीच्या आधीचे काही दिवस पाऊस कमी झाल्यामुळे येथील नागरिकांसह चाकरमानी सुद्धा निश्चिंत होते.मात्र गणेश चतुर्थीच्या तोंडावरच मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या आनंदावर पाणी फेरले गेले आहे.
गेल्या पंधरवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठीक-ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त केले होते या परिस्थितीतून सावरत सर्वांनीच आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू केली होती.बाप्पाच्या आगमना पूर्वी काही दिवस पाऊस कमी झाल्यामुळे गणेश चतुर्थी उत्सव उत्साहात संपन्न होईल अशी सर्वच भक्तांची मनोधारणा होती.मात्र ऐन चतुर्थीच्या तोंडावरच मुसळधार पाऊस दाखल झाल्यामुळे या आनंदावर पाणी फेरले गेले आहे.

3

4